अखेर मनू भाकरला खेलरत्न, डी. गुकेशचेही नाव यादीत, ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

WhatsApp Group

Khel Ratna Award : भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 जाहीर केले आहेत. स्टार नेमबाज मनू भाकरसह चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेता मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनू भाकरच्या नावावरून बराच वाद सुरू होता, ज्यामध्ये यापूर्वी तिच्या नावाची शिफारस करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत होते. सध्या तिच्या नावाची घोषणाही झाली आहे.

17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात भारताचे राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. समितीच्या शिफारशी आणि सविस्तर तपासणीनंतर क्रीडा मंत्रालयाने या खेळाडूंची निवड केली आहे.

32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

याशिवाय, क्रीडा मंत्रालयाने 2024 च्या अर्जुन पुरस्कारासाठी 32 खेळाडूंची निवड केली आहे, ज्यामध्ये 17 पॅरा ॲथलीट्सचा समावेश आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून सरकारने खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे. क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे की, हा पुरस्कार केवळ खेळाडूंच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा पुरावा नाही तर युवा पिढीला प्रेरणाही देतो. पुरस्कार सोहळ्यात विविध प्रशिक्षक, विद्यापीठे आणि संस्थांचाही गौरव करण्यात येणार आहे.

हेही वाचा – हॉटेलबाहेर इतकी गर्दी, जेवणासाठी लागते रांग, रांगेत उभे राहण्यासाठी भाड्याने ठेवतात लोक!

पॅरा हाय जम्पर प्रवीणने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये T64 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. हा खेळाडूंचा एक वर्ग आहे ज्यांचे एक किंवा दोन्ही पाय गुडघ्याच्या खाली नसतात आणि ते धावण्यासाठी कृत्रिम पायांवर अवलंबून असतात. क्रीडा मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की विजेत्यांना 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जातील.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment