कर्नाटकचा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने (Prakhar Chaturvedi 404 Not Out Runs) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अंडर-19 देशांतर्गत स्पर्धेच्या कूचबिहार ट्रॉफीच्या अंतिम फेरीत इतिहास रचला. त्याने मुंबईविरुद्ध नाबाद 404 धावा केल्या. जेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 400 धावा केल्या जातात, तेव्हा वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लाराचे नाव डोळ्यासमोर येते. त्याने इंग्लंडविरुद्ध 400 धावा केल्या होत्या. आता प्रखरने लाराचा पराक्रम केला आहे.
टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविडही या कर्नाटक संघाचा एक भाग आहे. प्रखर हा या संघाचा सलामीवीर आहे. त्याने 638 चेंडूत 46 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 404 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकने 8 गडी गमावत 890 धावा केल्या आणि डाव घोषित केला. मुंबईने पहिल्या डावात 380 धावा केल्या होत्या. कर्नाटककडे 510 धावांची आघाडी असल्याने सामना अनिर्णित राहिला.
हेही वाचा – आता सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल!
प्रखर चतुर्वेदीने समर्थ एनसोबत 9व्या विकेटसाठी 173 धावांची भागीदारी केली. समर्थने 135 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. प्रखरने हार्दिक राजसोबत 7व्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली होती. हर्षिल धर्मानीने 169 धावा केल्या. कार्तिकेय केपीने 72 धावा, हार्दिक राजने 51 धावा आणि कार्तिक एसयूने 50 धावा केल्या. समितने 22 धावा केल्या.
मुंबईची फलंदाजी
मुंबईसाठी आयुष महात्रेने 180 चेंडूत 145 धावा केल्या. आयुष सचिन वर्तकने 98 चेंडूत 73 धावा केल्या. नूतनने 44 धावा केल्या. प्रतीक यादवने 30 धावा केल्या. कर्णधार मनन भट्टने 28 धावा केल्या. सलामीवीर अवैस खानने 16 धावा केल्या. तनिश मेहरने 11 तर प्रेम देवकरने 6 धावा केल्या. कर्नाटककडून हार्दिक राजने 4 बळी घेतले. याशिवाय समर्थ एन आणि समित द्रविडने 2-2 विकेट घेतल्या. अगस्त्य एस राजू आणि धीरज गौडा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!