John Cena : काल 23 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी संध्याकाळी भारताने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या ऐतिहासिक चांद्रयान-3 लँडिंगपूर्वी WWE सुपरस्टार जॉन सीनाच्या पोस्टने चाहत्यांची मने जिंकली आहेत. जॉन सीनाच्या इंस्टाग्राम पोस्टला भारतीय चाहत्यांनी डोक्यावर घेतले.
जॉन सीनाने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर भारतीय राष्ट्रध्वजाचा एक फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. मात्र, जॉन भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेच्या समर्थनार्थ ही पोस्ट केल्याचे चाहत्यांना वाटते.
हेही वाचा – BRICS summit 2023 : ‘हे’ नवे 6 देश ब्रिक्समध्ये सामील! PM मोदींच्या उपस्थितीत घोषणा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यानाचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच केले. चंद्रावर पाणी शोधणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. चांद्रयानच्या यशानंतर संपूर्ण देशात जल्लोष करण्यात आला.
जॉन सीना भारतात येणार!
जॉन सीनाबाबत मोठी बातमी आहे. WWE कंपनीने सोमवारी पुष्टी केली की जॉन सीना पुढील महिन्यात ‘रिटर्न’ येईल. जॉन सीना 1 सप्टेंबर रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये स्मॅकडाउनवर दिसणार आहे. यानंतर, तो 8 सप्टेंबर रोजी भारतातील GMC बालयोगी इनडोअर स्टेडियमवर कंपनीसोबत येईल. तो भारतात नक्की काय करणार आहे हे माहीत नसले तरी WWE सुपरस्टार स्पेक्टॅक्युलर शोमध्ये फाईट करण्याचा विचार करत असल्याची माहिती त्याने सोशल मीडियावर दिली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!