जागतिक क्रिकेटमध्ये आता भारत ‘लीडर’, जय शाह आयसीसीचे नवे चेअरमन

WhatsApp Group

Jay Shah ICC Chairman : बीसीसीआयचे सचिव जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष बनले आहेत. जय शाह आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची जागा घेतील. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. बार्कले यांनी सलग दोन वेळा हे पद भूषवले. जय शहा 1 डिसेंबरपासून ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. शाह हे आयसीसीच्या वित्त व्यवहार उपसमितीचे अध्यक्षही आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी 27 ऑगस्ट ही नामांकनाची अंतिम तारीख होती. जय शहा यांच्याशिवाय या पदासाठी निर्धारित वेळेपर्यंत कोणीही उमेदवारी केली नाही. यानंतर आयसीसीच्या कार्यकारी मंडळाने जय शाह यांना बिनविरोध विजयी घोषित केले. 35 वर्षीय जय शाह आयसीसी अध्यक्ष बनणारा सर्वात तरुण बनला आहे. जय शाह 2019 पासून बीसीसीआय सचिव पदावर आहेत. आता त्यांना हे पद सोडावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाची सर्वसाधारण सभा पुढील महिन्यात किंवा ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

हेही वाचा – उत्तर प्रदेशचे ‘आत्मनिर्भर’ गाव, कोणी भाजीपाला खरेदी करत नाही, वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर

ICC चे नेतृत्व करणारा 5वा भारतीय

आयसीसीचे नेतृत्व करणारे जय शाह हे पाचवे भारतीय आहेत. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, शशांक मनोहर आणि एन श्रीनिवासन यांनी आयसीसीचे नेतृत्व केले आहे. जगमोहन दालमिया आणि शरद पवार यांनी आयसीसी अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment