“अश्विन दुर्मिळ आहे, त्याच्यासारखा खेळाडू…”, रोहित शर्माकडून कौतुक!

WhatsApp Group

IND vs ENG : भारतीय संघ गुरुवारी इंग्लंडसोबत पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. भारताने इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सध्याच्या कसोटी मालिकेत (IND vs ENG) 3-1 ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे. खेळला जाणारा पाचवा सामना ही केवळ औपचारिकता आहे. सामन्याच्या एक दिवस आधी, भारतीय कर्णधार रोहित शर्मा, जो आपला 100 वा कसोटी सामना खेळण्याच्या तयारीत आहे, त्याने रवीचंद्रन अश्विनला दुर्मिळ प्रतिभेचा खेळाडू म्हणून वर्णन केले. हा सामना अश्विन आणि इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जॉनी बेअरस्टो यांचा शंभरावा कसोटी सामना असेल, त्यामुळे याला महत्त्व आले आहे.

रोहितने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांना सांगितले की, 100 कसोटी सामने खेळणे ही कोणत्याही खेळाडूसाठी मोठी उपलब्धी असते. तो आमच्यासाठी सामना विजेता ठरला आहे. त्याने आपल्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींचा विचार करता, त्याचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमी आहे.

रोहित म्हणाला, ”गेल्या पाच-सात वर्षांतील कामगिरी बघा. प्रत्येक मालिकेत त्याने योगदान दिले आहे. त्याच्यासारखे खेळाडू दुर्मिळ आहेत.” अश्विनच्या नावावर सध्या कसोटी क्रिकेटमध्ये 507 बळी आहेत. अनिल कुंबळेनंतर कसोटी सामन्यात 500 हून अधिक बळी घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज आहे. धावा काढण्यासाठी धडपडणाऱ्या रजत पाटीदारलाही भारतीय कर्णधाराने साथ दिली. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या इतर भारतीय खेळाडूंइतकी कामगिरी पाटीदारला करता आली नाही.

हेही वाचा – मुंबईकरांना स्वस्त CNG गॅसची भेट..! महानगर गॅसकडून किंमतीत मोठी कपात

रोहित म्हणाला, ”पाटीदार हा सक्षम खेळाडू आहे. मला तो आवडतो. मी त्याच्याकडे एक प्रतिभावान खेळाडू म्हणून पाहतो. आम्हाला त्याला आणखी थोडा वेळ द्यावा लागेल. कठीण परिस्थितीतही संघाची कमबॅक करण्याची क्षमता विलक्षण आहे. आम्ही कमबॅकची प्रक्रिया सुरू ठेवली. जेव्हा-जेव्हा आमच्यावर दबाव आणला जातो, तेव्हा आम्ही प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्यात यशस्वी होतो. माझ्यासाठी ही सुखद परिस्थिती आहे. धरमशाला येथील खेळपट्टी चांगली असेल, अशी आशा आहे. ती टिपिकल भारतीय खेळपट्टीसारखी दिसते. तापमान कमी झाल्यावर इथे काही हालचाल होऊ शकते, परंतु एकूणच ही चांगली गोष्ट असल्याचे दिसते.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment