Irfan Pathan Over PCB’s complaint In Marathi : एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगला. टीम इंडियाने हा सामना अगदी सहज जिंकला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजयाचा रेकॉर्ड 8-0 ने वाढवला आहे. मात्र या सामन्यानंतर मोठा गदारोळ झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने या सामन्यानंतर आयसीसीकडे तक्रार केली. अहमदाबादच्या प्रेक्षकांनी पाकिस्तानी संघासोबत असभ्य वर्तन केले, असा आरोप त्यांनी आयसीसीकडे केला. या मुद्द्यावर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने भाष्य केले आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात समालोचन करताना इरफान पठाण (Irfan Pathan On Pakistan) म्हणाला, ”पाकिस्तानमध्ये खेळताना मी एका मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करत होतो. तेव्हा एकाने स्टेडियममधून खिळा फेकून मारला. तो खिळा माझ्या डोळ्याच्या खाली लागला. या घटनेनंतर 10 मिनिटे सामना थांबला. माझा डोळाही फुटू शकला असता. आम्ही या घटनेचा बाऊ केला नाही, कारण या समजण्यासारख्या गोष्टी असतात. पण पाकिस्तानच्या कोचने आपल्या संघाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांनी चाहत्यांच्या दृष्टीने आयसीसीकडे तक्रार केली. हे त्यांच्याच संघासाठी चुकीचे आहे. त्यांनी आपल्या गोष्टीवर, खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
हेही वाचा – VIDEO : केएल राहुलचा जबरदस्त कॅच, पुणेकरांचा स्टेडियममध्ये जल्लोष!
आयसीसीचे स्पष्टीकरण (IND vs PAK PCB’s Complaint)
वंशविद्वेष संहिता केवळ वैयक्तिक प्रकरणांपुरती मर्यादित असल्याने अहमदाबादमधील विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान चाहत्यांच्या कथित असभ्य वर्तनाच्या तक्रारीवर कारवाई करण्याची शक्यता नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. पाकिस्तानचे समर्थन करण्यासाठी पाकिस्तानी वंशाचे फक्त तीन अमेरिकन प्रेक्षक उपस्थित होते.
रिझवान बाद झाल्यानंतर…(IND vs PAK)
मोहम्मद रिझवान आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना प्रेक्षकांच्या एका गटाने धार्मिक घोषणाबाजी केली, त्यानंतर पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली. पाकिस्तानचे क्रिकेट संचालक मिकी आर्थर सांगितले, की भारताकडून 7 विकेटने झालेल्या पराभवावेळी त्यांच्या खेळाडूंना गर्दीच्या आवाजामुळे त्रास झाला होता.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!