Irfan Pathan Replies To Pakistan PM : टी-२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला तेव्हा अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही भारतीय संघाला टोमणे मारणारे एक ट्वीट केले होते, जे व्हायरल झाले होते. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने शाहबाज शरीफ यांच्या ट्वीटला उत्तर देत त्यांना बोलण्यापासून रोखले आहे.
भारत-इंग्लंड उपांत्य फेरीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्वीट केले की, रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. पण इथे शाहबाज शरीफ यांनी उपरोधिकपणे लिहिले की रविवारी १५२/० विरुद्ध १७०/० असा सामना होणार आहे. वास्तविक, गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता आणि यावर्षी इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने पराभव केला होता.
हेही वाचा – बॉलिवूडमधून गूड न्यूज..! बिपाशा बसू-करण सिंग ग्रोव्हर झाले आई-वडील
इरफान पठाणच चोख उत्तर!
शाहबाज शरीफ यांच्या या ट्विटवर इरफान पठाणने लिहिले, ”तुमच्या आणि आमच्यात हाच फरक आहे. आपण स्वतःच्या सुखात आणि इतरांच्या दुःखात सुखी असतो. त्यामुळे स्वतःचा देश सुधारण्यावर भर द्या.” इरफान पठाणचे हे ट्वीट व्हायरल झाले आणि भारतीय चाहत्यांनी त्याचे खूप कौतुक केले. टीम इंडियाला इंग्लंडकडून १० विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला आणि सेमीफायनलमधील त्यांचा प्रवास संपला.
Irfan Pathan replies to Pakistan PM Shehbaz Sharif's tweet.#CricTracker #IrfanPathan #ShehbazSharif #Pakistan pic.twitter.com/buxBMXKsYk
— CricTracker (@Cricketracker) November 12, 2022