IPL 2025 : केएल राहुलने नाकारली कर्णधारपदाची ऑफर, ‘हा’ खेळाडू दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन?

WhatsApp Group

KL Rahul : चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतल्यानंतर केएल राहुलने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, जी त्याने स्वीकारण्यास नकार दिला.

केएल राहुलचा नकार, अक्षर कर्णधार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारली आणि एक खेळाडू म्हणून संघात अधिक योगदान देऊ इच्छित असल्याचे सांगितले. केएल राहुलने संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिल्यानंतर, आता अक्षर पटेल दिल्ली फ्रेंचायझीची कमान सांभाळू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. कारण कर्णधारपदासाठी खरा संघर्ष या दोन नावांमध्ये होता.

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला १४ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. २०२०-२१ मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि २०२२ ते २०२४ पर्यंत तो लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार होता.  जेव्हा तो दिल्लीत सामील झाला, तेव्हा कर्णधारपदाच्या शर्यतीत त्याचे नाव आघाडीवर होते.

हेही वाचा – चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल बघताना १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, विराट कोहली बाद झाल्यानंतर हार्ट अटॅक?

राहुल हा आयपीएलमधील सर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. २०१८ ते २०२४ पर्यंत खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ७ पैकी ६ हंगामात त्याने ५०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. जर राहुल कर्णधार नसेल तर अक्षर कर्णधार होणार हे निश्चित दिसते. पण समस्या अशी आहे की त्याच्याकडे राहुलकडे मागील आयपीएलमध्ये होता तसा कर्णधारपदाचा अनुभव नाही. एक खेळाडू म्हणून, त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने स्वतःला अनेक वेळा सिद्ध केले आहे. पण त्याला अजूनही कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध करायचे आहे. कदाचित दिल्ली कॅपिटल्स त्याला तसे करण्याची संधी देईल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment