CarryMinati On Virat Kohli and RCB | लोकांना अनेकदा यूट्यूबवरील दुसऱ्यांच्या व्हिडिओंना रोस्ट करण्याचा विषय आवडतोच. रोस्ट करण्यात, कॅरीमिनाटी हा खूप प्रसिद्ध आहे. अजय नागर नामक व्यक्ती या क्षेत्रात कॅरीमिनाटी नावाने प्रसिद्ध आहे. कॅरीमिनाटी सध्या सोशल मीडियावर “SHAME ON CARRYMINATI” सह ट्रोल होतो. त्याने विराट कोहलीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोकांनी कॅरीमिनाटीची चांगलीच खिल्ली उडवली आहे.
सध्या आयपीएल 2024 सुरू झाले आहे. आणि पहिल्या सामन्यात आरसीबीचा सीएसकेकडून पराभव झाला. यानंतर कॅरीमिनाटीचा विराट कोहली आणि आरसीबीबाबत मत दिलेला व्हिडिओ व्हायल झाला. यात कॅरीमिनाटी म्हणतो, ”मला वाटतं विराटने गोड खाणे सोडलंय कारण त्याला सेलिब्रेशन करण्याची संधीच मिळत नाही. रोहितभाईला बघा. विराटच्या चक्करमध्ये एक मुलगी पूर्ण स्पर्धा बघते, पण बरंय शेवटचा आठवडा तिच्याकडे बघायला काहीही नसतं!”
यूट्यूबवरून कॅरीमिनाटी खूप कमावतो आणि करोडो लोक त्याला फॉलो करतात. कॅरी मिनातीची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आहे. त्याने इतर देशांमध्येही आपली लोकप्रियता पसरवली आहे. ORMAX Influencer India Love मध्ये कॅरीमिनाटीला भारतातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्ल्यूए्न्सर म्हणून ओळखले जाते. हा अहवाल जानेवारी 2024 चा आहे ज्यामध्ये कॅरी मिनाटीला पहिल्या क्रमांकावर, भुवन बामला दुसऱ्या क्रमांकावर, मिस्टर बिस्टला तिसऱ्या क्रमांकावर, आशिष चंचलानीला चौथ्या क्रमांकावर आणि संदीप माहेश्वरीला पाचव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. कॅरीमिनाटी ही भारतातील नंबर 1 यूट्यूबर आहे.
हेही वाचा – IPL 2024 : टुर्नामेंटचे किंग आम्हीच…! चेन्नईची विजयी सलामी, आरसीबी तोंडावर आपटली!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅरीमिनाटीची मासिक कमाई 25 लाख रुपये आहे. दर महिन्याला तो वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमावतो आणि त्याची मुख्य कमाई यूट्यूब चॅनलमधून येते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा