सुनील गावसकरांकडून राशिद खानचे कौतुक! म्हणाले, “जगभरातील फ्रेंचायझी त्याला….”

WhatsApp Group

IPL 2024 : आयपीएलच्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लीगच्या 24व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने शेवटच्या चेंडूवर 3 गडी राखून मात केली. राजस्थानचा हा 5 सामन्यातील पहिला पराभव ठरला. विजयाचा नायक राशिद खान होता. सामन्यानंतर राशिदला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला. राशिदच्या या शानदार खेळीनंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी त्याचे भरभरून कौतुक केले.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले, “जेव्हा फलंदाजीचा विचार आला तेव्हा राशिदने खेळपट्टी चांगली पिक केली. तो आला आणि धावा काढू लागला. यामुळेच जगभरातील फ्रेंचायझी त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी घाई करत आहेत. राशिदचा आत्मविश्वास, त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहून त्यांना त्यांच्या संघात घ्यायचे आहे. तो फिल्डिंगही जीव तोडून करतो.”

हेही वाचा – हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांकडून अटक!

गावसकर पुढे म्हणाले, “फिल्डिंग करताना, गोलंदाजांना डायव्हिंग करताना नेहमीच काळजी वाटते कारण त्यांच्या खांद्यावर काही दुखापत झाल्यास त्यांचे करिअर धोक्यात येऊ शकते. मात्र राशिद खानला तसे वाटत नाही. राशिदला आपल्या संघासाठी 100 टक्के द्यायचे असते.”

राशिद खानने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 11 चेंडूत 24 धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने 4 चौकारही मारले. गोलंदाजी करताना त्याने 4 षटकात 18 धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली. कर्णधार शुबमन गिलने 72 आणि साई सुदर्शनने 35 धावा करत पहिल्या विकेटसाठी 64 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. शेवटच्या चेंडूवर गुजरातला 2 धावांची गरज होती. राशिद खानने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment