SRH vs RR Qualifier 2 : पॅट कमिन्सच्या कॅप्टन्सीला सलाम! सनरायझर्स हैदराबादची फायनलमध्ये धडक

WhatsApp Group

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2 : पॅट कमिन्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 च्या क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सला धक्का देत अंतिम सामन्यात धमाकेदार प्रवेश केला आहे. चेपॉकवर रंगलेल्या सामन्यात हैदराबादने राजस्थानला 36 धावांनी मात दिली. राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान यांच्या जबरदस्त माऱ्यासमोर हैदराबादला 20 षटकात 175 धावा करता आल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनी सपशेल गुडघे टेकले आणि पराभव पत्करला. राजस्थानची 65 धावांवर 2 विकेट अशी स्थिती असताना हैदराबादचा कप्तान पॅट कमिन्सने शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्माकडे चेंडू सोपवला. या दोघांनी 5 विकेट्स काढत राजस्थानची अवस्था 92 धावांवर 7 बाद अशी केली. संजू सॅमसन (10), रियान पराग (6), शिमरोन हेटमायर (4) या फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याच्या नादात विकेट गमावली आणि राजस्थानचा पराभव निश्चित झाला.

राजस्थानकडून एकट्या ध्रुव जुरेलने अयशस्वी झुंज दिली. त्याने अर्धशतक साकारले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जुरेलने 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 56 धावा केल्या. हैदराबादकडून शाहबाज अहमदने 23 धावांत 3 तर अभिषेक शर्माने 24 धावांत 2 विकेट्स घेतल्या. राजस्थानला 20 षटकात 7 बाद 139 धावांपर्यंत पोहोचता आले.

हेही वाचा – पाकिस्तानी पत्रकाराने सुरेश रैनाला केलं ट्रोल, मग काय…चिन्नाथालानं दिलं सणसणीत उत्तर!

तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 बाद 175 धावा केल्या. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 34, राहुल त्रिपाठीने 37 आणि शाहबाज अहमदने 18 धावा केल्या. हेनरिच क्लासेनने 4 षटकारांसह 50 धावा केल्या. राजस्थानकडून बोल्टव्यतिरिक्त आवेश खानने 27 धावांत 3 बळी घेतले. संदीप शर्माने 2 विकेट्स काढल्या.

दोन्ही संघांची Playing 11

सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार), रियन पराग, ध्रुव जुरेल, रोव्हमन पॉवेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment