

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2 : आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेनरिच क्लासेनच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने राजस्थानला 176 धावांचे आव्हान दिले आहे. पॉवरप्लेमध्ये ट्रेंट बोल्टने 3 विकेट्स काढत हैदराबादला मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखले.
सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 9 बाद 175 धावा केल्या. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 34, राहुल त्रिपाठीने 37 आणि शाहबाज अहमदने 18 धावा केल्या. हेनरिच क्लासेनने 4 षटकारांसह 50 धावा केल्या. राजस्थानकडून बोल्टव्यतिरिक्त आवेश खानने 27 धावांत 3 बळी घेतले. संदीप शर्माने 2 विकेट्स काढल्या.
Innings Break!
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2024
A competitive 🎯 of 1️⃣7️⃣6️⃣ for a place in the #Final ‼️
Which way is it going folks – 🩷 or 🧡
Chase starts 🔜
Scorecard ▶️ https://t.co/Oulcd2G2zx#TATAIPL | #Qualifier2 | #SRHvRR | #TheFinalCall pic.twitter.com/lt9pGK5kLh
हेही वाचा – पाकिस्तानी पत्रकाराने सुरेश रैनाला केलं ट्रोल, मग काय…चिन्नाथालानं दिलं सणसणीत उत्तर!
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार), रियन पराग, ध्रुव जुरेल, रोव्हमन पॉवेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा