Sunil Gavaskar On Wide Balls Reviews : भारताचे दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर सध्या आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करत आहेत. विविध सामन्यांदरम्यान गावसकर अनेक गोष्टी शेअर करतात. नवनवीन तंत्रज्ञानावरही गावसकरांनी मत दिले आहे. आता त्यांनी आयपीएल सामन्यांदरम्यान खेळाडू वाईड चेंडूसाठी रिव्यू घेण्याबाबत राग व्यक्त केला आहे. हैदराबाद विरुद्ध बंगळुरू मॅचदरम्यान गावसकर बोलत होते.
या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी 5 तर आरसीबीच्या गोलंदाजांनी 8 वाईड चेंडू टाकले. यातील काही वाईड चेंडूवर गरज नसतानाही रिव्यू घेण्यात आले. यात खूप वेळ गेला. त्यामुळे कॉमेंट्री करताना गावसकरांनी आपला राग काढला. ते म्हणाले, ”वाईड चेंडूसाठी रिव्यू घेणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम. जरी वाईड दिला नाही खेळ सुरु ठेवा. रिव्यू फक्त आऊट-नॉट आऊटसाठी घेतला पाहिजे.”
हेही वाचा – IPL 2024 SRH Vs RCB : सलग 6 पराभवानंतर आरसीबीचा विजय, ‘सुप्रीम’ हैदराबादला त्यांच्याच मातीत हरवलं!
आयपीएलमध्ये सुसाट खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला घरच्या मैदानावर पराभव स्वीकारावा लागला आहे. आठपैकी सात पराभव चाखलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जबरदस्त खेळ दाखवत हैदराबादला 35 धावांनी मात दिली आणि स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादला 207 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात बंगळुरूच्या गोलंदाजांनी घातक मारा करत हैदराबादला 171 धावांवर रोखले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा