IPL 2024 SRH vs RCB Rajat Patidar : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आघाडीचा फलंदाज रजत पाटीदारने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध जबरदस्त खेळी केली आहे. त्याने अवघ्या 19 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाटीदार आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरूने 20 षटकात 7 बाद 206 धावा केल्या.
रजत पाटीदारने 20 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 50 धावांची खेळी केली. कप्तान फाफ डू प्लेसिस आणि विल जॅक्स बाद झाल्यानंतरही रजतने आक्रमक खेळी केली. त्याने मयंक मार्कंडेच्या एका षटकात 4 षटकार मारले. त्या षटकात मार्कंडेला एकूण 27 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहलीने 4 चौकार आणि एका षटकारासह 51 धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनने नाबाद 37 धावा तडकावल्या. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या.
हेही वाचा – गर्लफ्रेंडचा बर्गर खाल्ला म्हणून बॉयफ्रेंडने केली मित्राची हत्या!
दोन्ही संघातील Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज, यश दयाल.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा