IPL 2024 SRH vs MI : मुंबईकडून ‘नवा’ प्लेयर मैदानात..! हैदराबादची पहिली बॅटिंग, पाहा Playing 11

WhatsApp Group

IPL 2024 SRH vs MI | आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने प्लेईंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून सनरायझर्स हैदराबादने प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. आयपीएल 2024 मधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांना आपापल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत दोघेही आजचा सामना जिंकून गुणतालिकेत आपले खाते उघडण्याचा प्रयत्न करतील. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची सुरुवात नेहमीप्रमाणे चांगली झाली नाही. गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकण्याच्या स्थितीत असतानाही अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. तर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचे विजयात रूपांतर करता आले नाही आणि संघाला 4 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

दोन्ही संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमधून ल्यूक वुडला वगळण्यात आले आहे. 17 वर्षीय क्वेना मफाकाला स्थान मिळाले आहे. हा त्याचा पदार्पणाचा सामना आहे. दुसरीकडे, हैदराबाद संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. मार्को जानसेन आणि टी. नजरजन यांना वगळण्यात आले आणि त्यांच्या जागी ट्रॅव्हिस हेड आणि जयदेव उनाडकट यांना स्थान देण्यात आले.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ! डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीचे बोर्डावर गंभीर आरोप, म्हणाली, “तो त्यांना नको होता…”

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कप्तान), टिम डेविड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.

सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment