IPL 2024 : रोहित शर्माची डबल सेंच्युरी..! असा कारनामा करणारा मुंबई इंडियन्सचा पहिलाच खेळाडू

WhatsApp Group

IPL 2024 SRH vs MI Rohit Sharma | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 8 वा सामना खेळला जात आहे. रोहित शर्माने या सामन्याचा भाग होताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने विराट कोहली आणि धोनीच्या नावाचा समावेश असलेल्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळाडू म्हणून 200 वा सामना खेळत आहे. यासह तो आयपीएलमध्ये एका संघासाठी 200 सामने खेळणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या आधी हा पराक्रम विराट कोहली आणि एमएस धोनीने केला होता. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 200 सामने खेळले आहेत. तर धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी हा पराक्रम केला आहे.

IPL मध्ये एका संघासाठी 200 सामने खेळलेले खेळाडू

  • 239 सामने – आरसीबीसाठी विराट कोहली
  • 222 सामने – सीएसकेसाठी धोनी
  • 200 सामने – मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सकडून 200 सामने खेळणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा 2011 पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. रोहितने आयपीएल 2013 ते 2023 पर्यंत संघाचे नेतृत्वही केले होते. या काळात त्याने मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवले. त्याचवेळी रोहितने मुंबईसाठी आतापर्यंत 5084 धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू

  • रोहित शर्मा – 200 सामने
  • कायरन पोलार्ड – 189 सामने
  • हरभजन सिंग – 136 सामने
  • लसिथ मलिंगा – 122 सामने
  • जसप्रीत बुमराह – 121 सामने

हेही वाचा – IPL 2024 SRH Vs MI : मुंबईकडून ‘नवा’ प्लेयर मैदानात..! हैदराबादची पहिली बॅटिंग, पाहा Playing 11

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कप्तान), टिम डेविड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.

सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment