ट्रॅव्हिस हेडच्या रनआऊटवरून वाद, अंपायरचा निर्णय पाहून संगकाराही उठला!

WhatsApp Group

Travis Head Runout Controversy : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हैदराबादमध्ये सामना रंगत आहे. या सामन्यात हैदराबादचा कप्तान पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अडखळत सुरुवातीनंतर सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांनी अर्धशतके लगावली. हेडने 6 चौकार आणि 3 षटकारांसह 58 धावा केल्या. हेडची विकेट सर्वात लक्षात राहण्यासारखी ठरली.

राजस्थानचा वेगवान गोलंदाज आवेश खानने हेडला 15व्या षटकात बोल्ड केले. विकेट जाण्यापूर्वीच्या बॉलवर ट्रॅव्हिस हेड रनआऊट होताना वाचला. यष्टीपाठी गेलेला चेंडू संजू सॅमसनने फेकला. तो यष्ट्यांना आदळला. हेडची बॅट हवेत होती, असे प्रथमदर्शनी वाटले. पण रिव्ह्यू घेतल्यानंतर पंचांनी हेडने बॅट टेकवली, असा निर्णय दिला. हा निर्णय पाहून राजस्थानच्या डगआऊटमध्ये नाराजी उमटली. कुमार संगकारा पंचाना याबाबत विचारताना दिसला.

हेड बाद झाल्यानंतर हेनरिच क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी जबरदस्त फलंदाजी केली. दोघांमध्ये झटपट अर्धशतकी भागीदारी झाली. राजस्थानचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने चार षटकात 62 धावा खर्च केल्या. हैदराबादने 20 षटकात 3 बाद 201 धावा केल्या. क्लासेनने 19 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या. तर रेड्डीने जबरदस्त गुणवत्ता दाखवत नाबाद 76 धावांची खेळी केली. त्याने 3 चौकार आणि 8 षटकार मारले.

हेही वाचा – राहुल गांधींच्या अमेठी लढतीवर जवळपास शिक्कामोर्तब!

दोन्ही संघांची Playing 11

सनरायझर्सस हैदराबाद – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान, विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

राजस्थान रॉयल्स – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment