

IPL 2024 SRH vs LSG : हैदराबादमध्ये रंगलेल्या आयपीएलच्या रंजक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने टेबल टॉपर राजस्थान रॉयल्सचा फक्त एका धावेने पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या हैदराबादने 20 षटकात 3 बाद 201 धावा केल्या. अडखळत सुरुवातीनंतर सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांनी अर्धशतके लगावली. हेडने 6 चौकार आणि 3 षटकारांसह 58 धावा केल्या. क्लासेनने 19 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या. तर रेड्डीने जबरदस्त गुणवत्ता दाखवत नाबाद 76 धावांची खेळी केली. त्याने 3 चौकार आणि 8 षटकार मारले. प्रत्युत्तरात राजस्थाननेही कडवी झुंज दिली. यशस्वी जयस्वाल (67) आणि रियान पराग (77) यांनी शानदार अर्धशतके ठोकली.
1 चेंडू 2 धावा…
शेवटच्या षटकात 13 धावांची गरज असताना हैदराबादरकडून भुवनेश्वर कुमारने जबरदस्त गोलंदाजी केली. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रोव्हमन पॉवेलला भुवनेश्वरने मोठे फटके खेळू दिले नाहीत. शेवटी 1 चेंडू 2 धावा हव्या असताना पॉवेल पायचीत झाला आणि हैदराबादने विजय साजरा केला. राजस्थानने 20 षटकात 7 बाद 200 धावा केल्या.
हेही वाचा – ट्रॅव्हिस हेडच्या रनआऊटवरून वाद, अंपायरचा निर्णय पाहून संगकाराही उठला!
दोन्ही संघांची Playing 11
सनरायझर्सस हैदराबाद – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान, विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.
राजस्थान रॉयल्स – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा