VIDEO : आयपीएलचा रायझिंग स्टार नितीश कुमार रेड्डीचा हा सुपर कॅच पाहिला का?

WhatsApp Group

IPL 2024 SRH vs LSG Nitish Kumar Reddy Catch : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात आपल्या नवे सितारे भेटतात, ते मग पुढे येऊन इंडियन टीमच्या जर्सीपर्यंत प्रवास करतात. यंदाही आयपीएलमध्ये नितीश कुमार रेड्डीच्या नावाने एक युवा अष्टपैलू खेळाडू सापडला आहे. नितीशच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचा हैदराबादला भरपूर फायदा झालाय. नितीशने कधी फलंदाजीत तर कधी गोलंदाजीत आपली चमक दाखवलीय. आता लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध नितीशने क्षेत्ररक्षणातही कमाल केलीय. त्याने सीमारेषेवर अशक्य झेल टिपला.

नितीश हा यंदाच्या हंगामातील सापडलेल्या अप्रतिम क्षेत्ररक्षकांपैकी आहे. त्याने लखनऊविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर क्विंटन डी कॉकचा जबरदस्त झेल टिपला. पाहा त्याचा हा कॅच –

नितीश कुमार रेड्डीने आयपीएलच्या या मोसमात अप्रतिम कामगिरी केली आहे. 8 सामन्यांमध्ये त्याने 47.80 च्या सरासरीने 239 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही 152.23 आहे. त्याचबरोबर, एक गोलंदाज म्हणून त्याने या मोसमात आतापर्यंत केवळ 55 चेंडू टाकले आहेत आणि 3 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्याने 9.38 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या आहेत.

हेही वाचा – तेलंगणातील टेस्लाचा प्रकल्प भाजपने जबरदस्तीने गुजरातला नेला?

नितीश 2023 पासून आयपीएलचा भाग आहे. IPL 2023 च्या लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने नितीशला 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. पण गेल्या मोसमात त्याला फक्त 2 सामने खेळायला मिळाले. मात्र यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला असून नितीशनेही आपल्या संघाला निराश केले नाही. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहते नितीशला टीम इंडियाचा भावी स्टार म्हणून संबोधत आहेत.

करियर

नितीश कुमार रेड्डी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशकडून खेळतो. त्याने आतापर्यंत 17 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 566 धावा केल्या आहेत. याशिवाय 22 लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 403 धावा आहेत. त्याने प्रथम श्रेणीतही 52 विकेट घेतल्या आहेत. गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत एकूण 366 धावा केल्या. याशिवाय गोलंदाजीतही त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment