IPL 2024 SRH vs GT : पावसामुळे मॅच रद्द, सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफमध्ये, DC बाहेर!

WhatsApp Group

IPL 2024 SRH vs GT : आयपीएल 2023 च्या प्लेऑफचा तिसरा संघ निश्चित झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. या रद्द झालेल्या सामन्याचा फायदा हैदराबाद संघाला झाला जो न खेळता प्लेऑफसाठी पात्र ठरला. यामुळे दिल्ली कॅपिटल्सही स्पर्धेबाहेर पडली आहे. गुजरात टायटन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी एक गुण वितरित करण्यात आला. हैदराबादने 13 सामन्यांत 15 गुणांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला अजून एक सामना खेळायचा आहे. जर हैदराबादचा संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर त्यांचे 17 गुण होतील. हैदराबाद आपला शेवटचा साखळी सामना रविवारी पंजाब किंग्जविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यातील सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. मात्र सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे या सामन्यात नाणेफेक होऊ शकली नाही. आता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना जिंकणारा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणारा चौथा आणि शेवटचा संघ बनेल. मात्र, या सामन्यात नेट रन रेटही पाहायला मिळेल. हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना रद्द झाल्याने चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. गुणतालिकेत चेन्नई तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली आहे.

हेही वाचा – सकाळी उपाशी पोटी भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल आणि वजन घटवण्यासाठी रामबाण उपाय!

कोलकाता नाइट रायडर्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. कोलकाता 13 सामन्यांत 19 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर राजस्थान रॉयल्स 13 सामन्यांत 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. केकेआर आणि राजस्थान यांना लीग टप्प्यात अजून एक सामना खेळायचा आहे.

याआधी गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाताचा सामनाही पावसामुळे वाहून गेला होता. हा सामना अहमदाबादमध्ये होणार होता. गुजरात टायटन्सचा हा 14वा आणि शेवटचा सामना होता. गुजरातने 14 पैकी 5 सामने जिंकले तर 7 हरले आणि दोन सामने पावसामुळे पराभूत झाले. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 14 सामन्यांत 12 गुणांसह आपली मोहीम संपवली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment