RR vs RCB Eliminator : विराट कोहलीने रचला इतिहास! IPL मध्ये 8000 धावा ठोकणारा पहिला फलंदाज

WhatsApp Group

IPL 2024 RR vs RCB Eliminator Virat Kohli Record : विराट कोहलीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावांचा नवा इतिहास रचला आहे. किंग कोहली आयपीएलच्या इतिहासात 8000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटरमध्ये त्याने हा विक्रम केला.

विराट कोहली जेव्हा राजस्थान रॉयल्सविरुद्ध मैदानात उतरला, तेव्हा त्याच्या नावावर स्पर्धेची ऑरेंज कॅप आधीच होती. या सामन्यापूर्वी त्याने 708 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याने 29वी धाव घेताच आयपीएलच्या इतिहासातील 8000 धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी त्याच्या नावावर 251 सामन्यात 7971 धावा होत्या. आता त्याच्या नावावर 253 सामन्यांमध्ये 8004 धावा झाल्या आहेत. यामध्ये 8 शतकांचा समावेश आहे.

हेही वाचा – RR Vs RCB Eliminator : रोव्हमन पॉवेलचा सुपरमॅन कॅच..! डू प्लेसिसलाही विश्वास बसेना, पाहा Video

विराटला मात्र राजस्थान रॉयल्सविरुद्धचा डाव लांबवता आला नाही. युझवेंद्र चहलने आपल्या पहिल्या आणि डावाच्या आठव्या षटकात विराट कोहलीला बाद केले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात कोहली मिडविकेटच्या सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याने बाद होण्यापूर्वी 24 चेंडूत 33 धावा केल्या.

शिखर धवन (6769) हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. पण धवन आणि विराटमध्ये 1000 हून अधिक धावांचा फरक आहे. यावरून विराटच्या वर्चस्वाचा अंदाज लावता येतो. या यादीत रोहित शर्मा 6628 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment