IPL 2024 RR vs RCB Eliminator : आज आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा नॉकआऊट सामना असून हरणारा संघ थेट आयपीएलमधून बाहेर पडेल. विजेत्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागेल. फायनल 26 मे रोजी होणार आहे.
2020 सालापासून बंगळुरू संघ राजस्थानवर वर्चस्व गाजवत आहे. यात आरसीबीने सात सामने जिंकले असून राजस्थानने तीन सामने जिंकले आहेत. बाद फेरीतील दोन्ही संघांच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास, आरसीबीने सहा सामने जिंकले आहेत आणि नऊ गमावले आहेत, तर राजस्थानने बाद फेरीतील चार सामने जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत.
🚨 Toss Update 🚨
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
Rajasthan Royals elect to bowl against Royal Challengers Bengaluru.
Follow the Match ▶️ https://t.co/b5YGTn6RZd#TATAIPL | #RRvRCB | #Eliminator | #TheFinalCall pic.twitter.com/7zReTDiYP8
हेही वाचा – Paytm कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याचे संकट, RBI च्या कारवाईमुळे कंपनी तोट्यात
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, कॅमेरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा