RR vs RCB Eliminator : रोव्हमन पॉवेलचा सुपरमॅन कॅच..! डू प्लेसिसलाही विश्वास बसेना, पाहा Video

WhatsApp Group

IPL 2024 RR vs RCB Eliminator Rovman Powell Catch : राजस्थान रॉयल्सचा तडाखेबंद खेळाडू रोव्हमन पॉवेलने जबरदस्त कॅच घेत खळबळ उडवून दिली आहे. आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. अहमदाबादमध्ये रंगणाऱ्या या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसन याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्जला हरवून प्लेऑफमध्ये दिमाखात स्थान मिळवणाऱ्या आरसीबीला या सामन्यात विराट कोहली आणि कप्तान फाफ डू प्लेसिस यांनी चांगली सुरुवात मिळवून दिली. चांगल्या लयीत खेळणाऱ्या डू प्लेसिसचा हवेत सूर मारत कॅच घेत पॉवेलने सर्वांची वाहवा मिळवली.

विराट-डू प्लेसिस यांनी पहिल्या गड्यासाठी 37 धावा केल्या. राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने डू प्लेसिसला बाद करत ही जोडी फोडली. बोल्टच्या पाचव्या षटकात डू प्लेसिसने मि़ड ऑनला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा पुढे पडणारा चेंडू तिथे तैनात असलेल्या पॉवेलने हेरला आणि हवेत सूर मारत टिपला. डू प्लेसिसने 1 चौकार आणि एका षटकारासह 17 धावा केल्या.

हेही वाचा – ‘ही’ कंपनी झोपण्यासाठी देते पैसे, चांगली झोप आली तर मिळतो बोनस!

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, कॅमेरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment