RR vs RCB Eliminator : आरसीबीला यंदाही कप नाहीच..! रंगतदार सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजय

WhatsApp Group

IPL 2024 RR vs RCB Eliminator : आयपीएलच्या रंगतदार एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 4 गड्यांनी पराभव करत क्वालिफायर-2 साठी आगेकूच केली आहे. अहमदाबादमध्ये रंगलेल्या या थरारक सामन्यात दोन्ही संघांनी विजयासाठी अथक परिश्रम केले, शेवटी विजय राजस्थानच्या झोळीत येऊन पडला. त्यामुळे बंगळुरूचे यावर्षीही विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीने राजस्थानला 173 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 45 आणि रियान परागने 36 धावांचे योगदान देत राजस्थानला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. आता राजस्थानचा सामना 24 मार्चला सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.

आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमावून 172 धावा केल्या. त्यांच्याकडून रजत पाटीदारने 34 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहलीने 33, कॅमेरून ग्रीनने 27 आणि महिपाल लोमरोरने 32 धावा केल्या. कप्तान फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने 37 धावांची सलामी दिली. डू प्लेसिसने 17 धावा काढून बाद झाला. त्यानंतर प्रत्येक फलंदाजांने थोडेफार योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेलला भोपळाही फोडता आला नाही. राजस्थानकडून रवीचंद्रन अश्विनने 19 धावांत 2 विकेट्स काढत किफायतशीर गोलंदाजी केली. सुरुवातीला महागड्या ठरलेल्या आवेश खानने उत्तरार्धाच्या स्पेलमध्ये 3 विकेट्स काढल्या. ट्रेंट बोल्टने 1, संदीप शर्माने 1 आणि युझवेंद्र चहलने 1 विकेट काढली.

बंगळुरूच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि टॉम कोहलर-कॅडमोर यांनी पहिल्या गड्यासाठी 46 धावा केल्या. लॉकी फर्ग्युसनने कॅडमोरची (20) दांडी गूल करत ही जोडी फोडली. त्यानंतर कॅमेरून ग्रीनने यशस्वीला आणि कर्ण शर्माने संजू सॅमनला (17) बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. रियान परागने एका बाजूने किल्ला लढवत धावफलक हलता ठेवला. मोहम्मद सिराजने 18व्या षटकात परागला त्यानंतर शिमरोन हेटमायरला (26) बाद करत राजस्थानच्या ह्रदयाचे ठोके वाढवले. पण पुढच्याच षटकात रोव्हमन पॉवेलने दोन चौकार आणि एक षटकार मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. पॉवेल 16 धावांवर नाबाद राहिला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment