RR vs RCB Eliminator : बंगळुरूचे राजस्थानला 173 धावांचे आव्हान, आवेश खानचे 3 बळी!

WhatsApp Group

IPL 2024 RR vs RCB Eliminator : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगत आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीने राजस्थानला 173 धावांचे आव्हान दिले आहे. आरसीबीकडून रजत पाटीदारने 34 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहलीने 33, कॅमेरून ग्रीनने 27 आणि महिपाल लोमरोरने 32 धावा केल्या.

आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमावून 172 धावा केल्या. कप्तान फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने 37 धावांची सलामी दिली. डू प्लेसिसने 17 धावा काढून बाद झाला. त्यानंतर प्रत्येक फलंदाजांने थोडेफार योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेलला भोपळाही फोडता आला नाही. राजस्थानकडून रवीचंद्रन अश्विनने 19 धावांत 2 विकेट्स काढत किफायतशीर गोलंदाजी केली. सुरुवातीला महागड्या ठरलेल्या आवेश खानने उत्तरार्धाच्या स्पेलमध्ये 3 विकेट्स काढल्या. ट्रेंट बोल्टने 1, संदीप शर्माने 1 आणि युझवेंद्र चहलने 1 विकेट काढली.

हेही वाचा –RR Vs RCB Eliminator : विराट कोहलीने रचला इतिहास! IPL मध्ये 8000 धावा ठोकणारा पहिला फलंदाज

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, कॅमेरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment