IPL 2024 RR vs PBKS : आयपीएलमध्ये प्लेऑफची शर्यत रोमांचक वळणावर आली आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुवाहाटीमध्ये रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थानचा 5 गड्यांनी पराभव केला. या विजयाचा हिरो ठरला पंजाबचा कप्तान सॅम करन. गोलंदाजी करताना त्याने 2 विकेट्स काढल्या आणि फलंदाजीत 5 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 63 धावांची खेळी केली.
संथ आणि कमी उसळी असलेल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला 20 षटकात 9 बाद 144 धावा करता आल्या. त्यांच्याकडून लोकल बॉय रियान परागने 48 धावांची सर्वाधिक खेळी केली. इतर फलंदाज मोठे योगदान देण्यात अपयशी ठरले. करनशिवाय हर्षल पटेल, राहुल चहर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात फलंदाजी करताना पंजाबची सुरुवात खराब झाली. त्यांनी 48 धावांत 4 विकेट्स गमावल्या. कप्तान करनने एका बाजूने किल्ला लढवला. आधी रायली रुसो (22) आणि जितेश शर्मा (22) यांच्यासोबत करनने धावफलक हलता ठेवला. राजस्थानकडून आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IPL 2024 : स्टेडियममध्ये मॅच पाहायला गेला तरुण, असं काही झालं, की असोसिएशनवर केली FIR
पहिल्या दोन जागांमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात राजस्थानला अजून एक धक्का बसला. त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे, पण गेल्या काही आठवड्यांत त्यांचा फॉर्म पूर्णपणे उतरला आहे. आता सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात प्लेऑफसाठी झुंज कायम आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा