IPL 2024 RR vs MI : धोकादायक गोलंदाजी आणि यशस्वी जयस्वालच्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा स्पर्धेत मुंबई इंडियन्सला मात दिली आहे. जयपूरमध्ये रंगलेल्या सामन्यात राजस्थानने 9 गड्यांनी विजय मिळवला. यशस्वीने 9 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सचे सर्वच खेळाडू या सामन्यात हतबल दिसत होते. क्षेत्ररक्षणातही मुंबईच्या खेळाडूंनी चुका केल्या. राजस्थानने 8 सामन्यांमध्ये 7 विजयासह 14 गुण मिळवले आहेत. मुंबईचा 8 सामन्यांमध्ये पाचवा पराभव ठरला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 179 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून संदीप शर्माने पाच बळी घेतले. अखेरच्या षटकात संदीप शर्माने मुंबई इंडियन्सच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबई इंडियन्ससाठी तिलक वर्माने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय नेहल वढेराने 49 धावा केल्या.
प्रत्युत्तरात राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी चांगली सुरुवात केली. बटलरने 6 चौकारांसह 35 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 74 धावा ठोकल्या. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने यशस्वीला साथ दिली. यशस्वीने 19व्या षटकात शतक साजरे केले. यशस्वीने सॅमसनसोबत शतकी भागीदारीही केली. सॅमसनने नाबाद 38 धावा केल्या.
हेही वाचा – “हार्दिकला काढा, मार्क बाऊचरची हकालपट्टी करा…”, मुंबई इंडियन्सचा खेळ पाहून लोक संतापले!
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्स – इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा