IPL 2024 Mumbai Indians : जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (RR vs MI) सामन्यात मुंबई इंडियन्सने खराब कामगिरीचे प्रदर्शन केले. मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या कमाल गोलंदाजीच्या जोरावर मुंबईची अवस्था 4 विकेट्स आणि 52 धावा अशी झाली. तिलक वर्मा आणि पहिला सामना खेळणाऱ्या नेहल वढेराने अर्धशतके केल्यामुळे मुंबईला 180 धावांपर्यंत जाता आले. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव हे मुंबईचे स्टार फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. कागदावर बलाढ्य दिसणारी मुंबईची फलंदाजी प्रत्यक्षात कशी फसवी ठरू शकते, याचे उदाहरण या सामन्यात पाहायला मिळाले.
रोहित शर्माची कॅप्टन्सी दिलेला हार्दिक पांड्या परत सर्वांच्या टीकेचा धनी ठरला. आधीच खराब फॉर्मात असलेल्या हार्दिकसाठी तीव्र डोकेदुखी म्हणजे हा सामना. त्यात टॉस जिंकूनही फायदा उचलता न आल्यामुळे हार्दिकला ट्रोल केले जात आहे. हार्दिक या सामन्यात फक्त 10 धावा करू शकला. शिवाय फलंदाजीलाही खूप खालच्या क्रमांकावर आला. नेहल वढेरा आणि तिलक वर्मा बाद झाल्यानंतर हार्दिकला स्कोअर वाढवता आला नाही. हार्दिकनंतर आलेला टिम डेव्हिडलाही जास्त काही करता आले नाही.
हेही वाचा – भाजप नेत्याची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी! तिकीट न मिळाल्याने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीतही पहिले षटक जसप्रीत बुमराहला न देता, हार्दिकने स्वत: च टाकले. कॅप्टन्सीतही कमकुवत बाजू दिसू लागल्या, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या स्पर्धेतील खराब कामगगिरीमुळे हेड कोच मार्क बाऊचरलाही मान खाली घालावी लागतेय. सोशल मीडियावर लोकांनी बाऊचरची हकालपट्टी करावी अशी मागणी केलीय.
रोहित शर्माची बॅट शांत
या सामन्यात रोहित शर्माची बॅट शांत राहिली हे विशेष. ट्रेंट बोल्टने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहितने या सामन्यात 5 चेंडूंचा सामना केला आणि 1 चौकाराच्या मदतीने केवळ 6 धावा केल्या. लॅप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा