IPL 2024 RR vs LSG : राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी विजय, संजू सॅमसनचा रोहित शर्माला छोबीपछाड!

WhatsApp Group

IPL 2024 RR vs LSG | आयपीएल 2024 च्या चौथ्या सामन्यात रविवारी राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा 20 धावांनी पराभव केला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 193 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्स संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 173 धावा करता आल्या.

राजस्थानच्या फलंदाजांमध्ये कर्णधार संजू सॅमसनने 52 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याने सहा षटकार आणि तीन चौकार मारले. सॅमसनशिवाय रियान परागने 29 चेंडूत 43 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 24 आणि ध्रुव जुरेलने नाबाद 20 धावा केल्या. तर लखनऊ सुपर जायंट्सकडून नवीन उल हकने दोन विकेट घेतल्या.

हेही वाचा – IPL 2024 GT Vs MI : मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस..! Playing 11 मध्ये नवे चेहरे, पाहा

विजयासाठी 194 धावांचा पाठलाग करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचे तीन विकेट केवळ 11 धावांत बाद झाले. त्यानंतर कर्णधार केएल राहुलने 44 चेंडूत 58 धावा केल्या. दीपक हुडाने 13 चेंडूत 26 धावांची जलद खेळी केली. निकोलस पूरन नाबाद राहिला आणि त्याने 41 चेंडूत सर्वाधिक 64 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेंट बोल्टने दोन बळी घेतले.

संजू सॅमसनने रोहित शर्माला टाकले मागे

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने 52 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले. संजूने एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर केला. आयपीएलच्या एकाच सामन्यात 5 किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याच्या बाबतीत संजूने रोहित शर्माला मागे टाकत भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. संजूने 11 वेळा अशी कामगिरी केली आहे तर रोहितने 10 वेळा एका डावात 5 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. या यादीत केएल राहुल पहिला आहे ज्याने एका सामन्यात 12 वेळा पाच किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment