1 बॉल, 2 रन…राशिद खानचा सुपर चौकार! रोमांचक सामन्यात ‘बलाढ्य’ राजस्थानचा पहिला पराभव

WhatsApp Group

IPL 2024 RR vs GT : जयपूरमध्ये रंगलेल्या जबरदस्त सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला आहे. विजयासाठी 1 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना राशिद खानने आवेश खानला चौकार ठोकत गुजरातला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या राजस्थानने 20 षटकात 3 बाद 196 धावा फलकावर लावल्या. रियान परागने 3 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांसह 76, संजू सॅमसनने 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 68 धावांची खेळी केली. राजस्थानचा हा स्पर्धेतील पहिला पराभव आहे. यापूर्वीचे चारही सामने त्यांनी जिंकले आहेत. गुजरातचा हा सहा सामन्यांतील तिसरा विजय आहे.

प्रत्युत्तरात गुजरातचा कप्तान शुबमन गिलने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 72 धावा केल्या. साई सुदर्शनने 35 धावांची खेळी केली. राशिद खानने 11 चेंडूत 4 चौकारांसह 24 धावा ठोकल्या. राहुल तेवतियाने 22 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून कुलदीप सेनने सर्वाधिस 3 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलला 2 विकेट्स घेता आल्या.

हेही वाचा – नीरज चोप्राला मिळू शकतात 41.60 लाख..! ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मारलं तर होईल मालामाल

दोन्ही संघांची Playing 11

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स – शुबमन गिल (कप्तान), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment