IPL 2024 RR vs DC : ऋषभ पंतला राग अनावर, बॅटही जोरात आपटली! पाहा Video

WhatsApp Group

IPL 2024 RR vs DC Rishabh Pant | ऋषभ पंतच्या क्रिकेटमधील कमबॅकमुळे सर्वांना उत्सुकता आहे. पंतने आयपीएल 2024 मध्ये कमबॅक केले. वर्षभरापूर्वी भयानक कार अपघातातून तो बचावला. त्यानंतर प्रचंड मेहनत करून त्याने स्वत: ला तंदुरुस्त केले. यावेळी पंत दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान आहे. पण पंतचे म्हणावे तसे कमबॅक झालेले नाही. दिल्लीने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले. त्यात ऋषभ पंतचीही कामगिरी म्हणावी तेवढी चांगली झालेली नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्ध पंतला मोठी खेळी करता आली नाही. आऊट झाल्यानंतर त्याने डगआऊटमध्ये परतत असताना आपला राग काढला, त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

राजस्थान रॉयल्सने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी मात देत सलग दुसरा विजय नोंदवला. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. राजस्थानकडून आवेश खानने तिखट मारा करत फक्त 4 धावा दिल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. रियान परागच्या नाबाद 84 धावांच्या जोरावर राजस्थानने 20 षटकात 5 बाद 185 धावा केल्या. हे आव्हान दिल्लीला पेलवले नाही. त्यांच्याकडून डेव्हि़ड वॉर्नरने 49 तर ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 44 धावांची खेळी केली. पण ती अपूर्ण ठरली. ऋषभ पंतही 26 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. युझवेंद्र चहलने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. यानंतर पंत रागात तंबूत परतत असताना दिसला, त्याने आपली बॅटही आपटली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment