IPL 2024 RCB Vs PBKS Virat Kohli Record : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये एक रोमांचक लढत पाहायला मिळाली. होळीच्या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात सर्वांच्या नजरा स्टार खेळाडू विराट कोहली आणि शिखर धवनवर लागल्या होत्या. बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने एक विक्रम केला जो आतापर्यंत सुरेश रैनाच्या नावावर होता.
सोमवारी, 25 मार्च रोजी संपूर्ण भारतात होळी साजरी करण्यात आली आणि रंगांच्या सणानिमित्त चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहण्याची संधी मिळाली. नाणेफेक हरल्यानंतर पंजाब किंग्ज संघ प्रथम फलंदाजीला आला. कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या आणि संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 6 गडी गमावून 176 धावा केल्या. अखेरीस शशांक सिंगने 8 चेंडूत 21 धावांची खेळी करत संघाला या धावसंख्येपर्यंत नेले.
विराट कोहलीचा विक्रम
होळीच्या दिवशी पंजाब किंग्जविरुद्ध खेळायला आलेल्या विराट कोहलीने हा सामना संस्मरणीय बनवला. संघाचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोचा झेल घेत त्याने रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले. विराट कोहली भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू ठरला. याआधी सुरेश रैनाचे नाव या यादीत अग्रस्थानी होते. रोहित शर्मा तिसऱ्या तर मनीष पांडे चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – IPL 2024 RCB Vs PBKS : पंजाब किंग्जचे आरसीबीसमोर 177 धावांचे लक्ष्य!
सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम
भारताकडून टी-20 मध्ये 174 झेल घेण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये सुरेश रैनाने भारताकडून 172 झेल घेतले होते. रोहित शर्माच्या नावावर 167 झेल घेण्याचा विक्रम आहे. मनीष पांडेने टी20 मध्ये आतापर्यंत एकूण 146 झेल घेतले आहेत. मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 136 झेल घेतले आहेत.
या सामन्यात विराट कोहलीने 11 चौकार आणि 2 षटकारांसह 77 धावा केल्या. हर्षल पटेलने त्याला बाद केले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा