

IPL 2024 RCB Vs PBKS : आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आयपीएलमध्ये सामना खेळत आहेत. 17 व्या मोसमातील हा सहावा सामना आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. आरसीबीला 177 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. नाणेफेक हारल्यानंतर पंजाबने 20 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 37 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. त्याने प्रभसिमरन सिंग (25) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली.
लियाम लिव्हिंगस्टोनने 17 धावांचे योगदान दिले. जितेश शर्मा (27) आणि सॅम करन (23) यांनी चौथ्या विकेटसाठी 52 धावा जोडल्या. शशांक सिंग 21 धावांवर नाबाद राहिला. आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन तर यश दयाल आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – रोहित शर्माचा लहान मुलासारखा होळी खेळतानाचा Video व्हायरल, पाण्यात मारली स्लाईड!
दोन्ही संघांची Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
पंजाब किंग्ज – शिखर धवन (कप्तान), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा