IPL 2024 RCB vs CSK : ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस, चेन्नईची पहिली बॉलिंग, पाहा Playing 11

WhatsApp Group

IPL 2024 RCB vs CSK : आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात महत्त्वाचा सामना रंगत आहे. चिन्नास्वामीवर होणाऱ्या या सामन्यात चेन्नईचा कप्तान ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानी कोणता संघ असणार, हे या सामन्यानंतर कळेल. याआधी कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. चेन्नईने संघात एक बदल केला आहे. मोईन अलीच्या जागी मिचेल सँटनरला संधी मिळाली आहे. आरसीबीमध्ये ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन झाले आहे.

चेन्नई सुपर किंग्जचे 14 गुण आहेत आणि त्याचा नेट रन रेट 0.528 आहे. अशा परिस्थितीत, त्याचा दावा मजबूत आहे, तर आरसीबीचे 12 गुण आहेत आणि ते 0.387 च्या धावगतीने 7 व्या क्रमांकावर आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर सीएसकेला आरसीबीकडून एकदा पराभव पत्करावा लागला आहे.

हेही वाचा – RBI ची ‘या’ बँकेवर मोठी कारवाई..! 59 लाखांहून अधिक रुपयांचा दंड, ग्राहकांवर परिणाम?

दोन्ही संघांची Playing 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज – रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कप्तान), डॅरिल मिचेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महीष थिक्षना.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment