IPL 2024 RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात आरसीबीने सीएसकेला 27 धावांनी हरवले. नाणेफेक गमावलेल्या आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सीएसकेला 219 धावांचे आव्हान दिले. सीएसकेचा नेट रनरेट पाहता आरसीबीला 201 धावांच्या आत ऋतुराज सेनेला रोखायचे होते.
शेवटच्या षटकात 17 धावांची गरज…
शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 17 धावांची गरज होती. महेंद्रसिंह धोनीने यश दयालच्या पहिल्या चेंडूवर 110 मीटर लांब षटकार खेचला. पण पुढच्याच चेंडूवर तो माघारी परतला. त्यानंतर मात्र सीएसकेच्या आशा मावळल्या. रवींद्र जडेजाने 22 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 42 धावांची अयशस्वी झुंज दिली. अजिंक्य रहाणेने 33 धावा केल्या. तर रचीन रवींद्रने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावांची खेळी केली.
𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂 seal the final spot for #TATAIPL 2024 Playoffs ❤️
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
What a turnaround 🫡
Scorecard ▶️ https://t.co/7RQR7B2jpC#RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/yHS7xnEn8x
हेही वाचा – RCB Vs CSK : 39 वर्षीय फाफ डू प्लेसिसचा अविश्वसनीय झेल..! विराट कोहलीकडून Kiss, पाहा Video
Nail-biting overs like these 📈
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2024
Describe your final over emotions with an emoji 🔽
Recap the match on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #RCBvCSK pic.twitter.com/XYVYvXfton
तत्पूर्वी, कप्तान फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी 78 धावांची भागीदारी केली. विराटने 3 चौकार आणि 4 षटकारांसह 47 धावा केल्या, तर डू प्लेसिसने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 54 धावा फटकावल्या. मिचेल सँटनरने ही जोडी फोडली. या दोघांनंतर रजत पाटीदारने 2 चौकार आणि 4 षटकारांसह 41 धावा चोपल्या. कॅमरून ग्रीन 3 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावांवर नाबाद राहिला. आरसीबीने 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. तुषार देशपांडेने एक, शार्दुल ठाकूरने 2 विकेट्स घेतल्या.
दोन्ही संघांची Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.
चेन्नई सुपर किंग्ज – रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कप्तान), डॅरिल मिचेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महीष थिक्षना.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!