RCB vs CSK : आयपीएलमध्ये फिक्सिंग? फाफ डू प्लेसिसला आऊट दिल्यावर RCB चाहते भडकले!

WhatsApp Group

IPL 2024 RCB vs CSK Faf du Plessis Wicket : आज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मोठा सामना रंगत आहे. चिन्नास्वामीवर होणाऱ्या या सामन्यात आरसीबीचा कप्तान फाफ डू प्लेसिसच्या विकेटवर चर्चा रंगली. डू प्लेसिस नॉन स्ट्राइक एंडवर धावबाद झाला. मिचेल सँटनरच्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या रजत पाटीदारने सरळ फटका खेळला. तेव्हा हा चेंडू सँटनरच्या बोटांना स्पर्श करून स्टम्प्सवर आदळला. तिसऱ्या पंचांनी या चेंडूवर डू प्लेसिसला बाद ठरवले.

या विकेटनंतर आरसीबीचे सर्व चाहते नाराज दिसले. डगआऊटमध्ये बसलेल्या आरसीबीचे खेळाडूही डू प्लेसिसला बाद दिल्यानंतर आश्चर्यचकित झाले. डू प्लेसिसची बॅट काही मिलीसेकंद हवेत असल्याचे पंचांनी ठरवले. पण या विकेटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी पंचांना कमालीचे ट्रोल केले. डू प्लेसिसने या सामन्यात 3 चौकार आणि 3 षटकारांसह 54 धावांची खेळी केली. त्याने विराट कोहलीसोबत पहिल्या गड्यासाठी 78 धावांची पार्टनरशिप रचली. विराट 47 धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याला सँटनरनेच डॅरिल मिचेलकरवी झेलबाद केले.

दोन्ही संघांची Playing 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – फाफ डू प्लेसिस (कप्तान), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज – रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कप्तान), डॅरिल मिचेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महीष थिक्षना.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment