IPL 2024 RCB vs CSK MS Dhoni : आयपीएल 2024 हंगामातील सर्वात मोठा सामना बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना बाद फेरीसारखाच होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 27 धावांनी पराभव करून प्लेऑफचे तिकीट मिळवले. अशाप्रकारे कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्सनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
प्लेऑफ संघ ठरले असले, तरी कोण कोणाशी स्पर्धा करेल हे अद्याप स्पष्ट नाही. कोलकाता नाईट रायडर्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, परंतु दुसऱ्या स्थानावर अजूनही बदल शक्य आहे. राजस्थान रॉयल्स 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर सनरायझर्स हैदराबादला 17 गुण गाठण्याची संधी आहे. राजस्थानने शेवटचा सामना गमावला आणि हैदराबादने विजय मिळवला, तर यात बदल होईल.
हेही वाचा – RCB Vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफचे तिकीट! चेन्नईचा पत्ता कट
धोनीचा शेवटचा सामना?
महेंद्रसिंह धोनीचा हा आयपीएलमधील शेवटचा सामना ठरू शकतो. कारण त्याचे वय आणि दुखापत पाहता पुढच्या वर्षी तो खेळेल, याची शक्यता कमीच आहे. धोनीने आरसीबीविरुद्ध 13 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह 25 धावांची खेळी केली. यात त्याच्या 110 मीटर लांब षटकाराचा समावेश आहे.
MS Dhoni’s last six in professional cricket?
— Siddharth (@DearthOfSid) May 18, 2024
110 METRES 🔥
pic.twitter.com/gjubVJ5wNe
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा