मुंबई इंडियन्स अजूनही खेळू शकते IPL 2024 Playoffs, जाणून घ्या समीकरण!

WhatsApp Group

IPL 2024 Playoffs : आयपीएल 2024 चे 50 सामने पूर्ण झाले आहेत, परंतु अद्याप कोणताही संघ प्लेऑफ खेळणार हे निश्चित नाही. पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स (16) जवळपास प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, पॉइंट टेबलमध्ये नवव्या आणि 10व्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे देखील 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. केवळ 14 गुणच नाही तर ते प्लेऑफमध्ये शकतात.

आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स सध्या 8 सामने जिंकून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, लखनउ सुपरजायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद प्रत्येकी 12 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचे 10-10 गुण आहेत. पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्सचे 8-8 गुण आहेत. या सगळ्यानंतर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ आहेत, ज्यांचे 6-6 गुण आहेत.

आता स्पर्धेत 20 साखळी सामने बाकी आहेत. जर राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचे सर्व सामने जिंकले तर दोघेही 20 किंवा त्याहून अधिक गुण मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. यानंतर, जर लखनऊ आणि हैदराबादचे संघ त्यांचे सर्व सामने गमावले (ज्यामध्ये ते दोघे प्रतिस्पर्धी आहेत ते वगळता), तर लखनऊ किंवा हैदराबादचे 14 गुण होतील, ज्यामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीत राहतील.

हेही वाचा – टीम इंडियाला जब्बर धक्का! टेस्टमध्ये ‘ही’ टीम बनली नंबर-1

जर हे सर्व घडले आणि लखनऊ सुपरजायंट्स किंवा सनरायझर्स हैदराबादचे 14 गुण झाले तर मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचाही मार्ग खुला होऊ शकतो. मात्र यासाठी मुंबई इंडियन्स आणि आरसीबीला आपले सर्व सामने जिंकावे लागतील. जर या संघांनी त्यांचे सर्व सामने जिंकले तर त्यांचे 14 गुण होतील.

केकेआरकडून मुंबई हरली तर…

मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभव झाला तरी त्यांची टॉप-4 मध्ये राहण्याची शक्यता कायम आहे. मात्र यासाठी वर नमूद केलेली सर्व समान समीकरणे लागू होतील. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससह 7 संघांचे समान 12 गुण होतील आणि चांगला रनरेट असलेला संघ प्लेऑफमध्ये जाईल. आरसीबीसाठी हेच समीकरण आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment