IPL 2024 PBKS vs RCB : मुंबई इंडियन्सपाठोपाठ पंजाब किंग्ज स्पर्धेबाहेर, आरसीबीचा मोठा विजय!

WhatsApp Group

IPL 2024 PBKS vs RCB : सॅम करनच्या नेतृत्वात खेळणारी पंजाब किंग्ज आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून बाहेर पडली आहे. घरच्या मैदानावर खेळताना पंजाब किंग्जचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 60 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पंजाबची आरसीबीने धुलाई केली. विराट कोहली, रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांच्या खेळीच्या जोरावर आरसीबीने 241-7 अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात पंजाबनेही कडवी झुंज दिली. रायली रुसो, शशांक सिंग यांनी फटकेबाजी केली, पण त्यांचा डाव 181 धावांवर आटोपला.

दोन जीवनदान लाभलेल्या विराटने या सामन्यात 7 चौकार आणि 6 षटकारांसह 92 धावांची जबरदस्त खेळी केली. विराटशिवाय रजत पाटीदारने 23 चेंडूत 3 चौकार आणि 6 उत्तुंग षटकारांस 55 तर कॅमेरून ग्रीनने 5 चौकार आणि एका षटकारास 46 धावा केल्या. पंजाबकडून पदार्पणवीर विद्वत कावेरप्पाने 2, हर्षल पटेलने 3 विकेट्स काढल्या.

हेही वाचा – तरुणांनो बायोडेटा तयार ठेवा, जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात 5 लाख नोकऱ्या देणार!

प्रत्युत्तरात पंजाबकडून रुसोने 9 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावांची आक्रमक खेळी केली. शशांक सिंगने 19 चेंडूत 37 धावा केल्या. सॅम करनने 22 धावा केल्या. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 तर लॉकी फर्ग्युसन, कर्ण शर्मा आणि स्वप्नील सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या. या पराभवामुळे पंजाब किंग्जचा आयपीएल 2024 मधील प्रवास संपुष्टात आला आहे, तर आरसीबीने आपले आव्हान जिवंत ठेवले आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment