IPL 2024 PBKS vs RCB : आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. दोघांसाठी करो वा मरो असलेल्या सामन्यात आरसीबीने पंजाबसमोर 241 धावांचे अवघड आव्हान ठेवले आहे. दोन जीवनदान लाभलेल्या विराटने या सामन्यात 7 चौकार आणि 6 षटकारांसह 92 धावांची जबरदस्त खेळी केली. विराटशिवाय रजत पाटीदारने 23 चेंडूत 3 चौकार आणि 6 उत्तुंग षटकारांस 55 तर कॅमेरून ग्रीनने 5 चौकार आणि एका षटकारास 46 धावा केल्या. पंजाबकडून पदार्पणवीर विद्वत कावेरप्पाने 2, हर्षल पटेलने 3 विकेट्स काढल्या.
या सामन्यात विराट कोहलीने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना थक्क केले. कोहलीने आपल्या झंझावाती फलंदाजीने स्ट्राईक रेटवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न पुन्हा एकदा खोडून काढले. कोहलीचे या मोसमातील दुसरे शतक 8 धावांनी हुकले. पण त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली तेही विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघासाठी चांगले संकेत आहेत. मात्र, शतक हुकल्याने विराट कोहली थोडा निराश झाला होता, त्यानंतर डगआऊटवर जाताना त्याने बॅटही फेकली.
हेही वाचा – VIDEO : “नरेंद्र मोदी तू कौन है…”, संजय राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य, औरंगजेबाशी तुलना!
विराटने या मोसमात 600 हून अधिक धावाही केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. पावसामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रायली रुसो, शशांक सिंग, सॅम करन (कप्तान), लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, विद्वत कावेरप्पा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कप्तान), विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंह, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा