IPL 2024 PBKS vs DC | इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने दणदणीत विजयाने सुरुवात केली आहे. पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव केला. सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाई होप आणि अभिषेक पोरेल यांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली संघाने 9 गडी गमावून 174 धावा केल्या होत्या. सॅन करनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर पंजाब संघाने शेवटच्या षटकात लक्ष्य गाठले आणि 4 गडी राखून विजय मिळवला.
दिल्लीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जच्या फलंदाजांनी दिल्लीला 174 धावांत रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाने 100 धावांत 4 विकेट गमावल्या. यानंतर सॅन करनने 67 धावांची खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. खलील अहमने लागोपाठ दोन चेंडूंवर प्रथम करन आणि नंतर शशांक सिंहला बाद करून रंगत निर्माण केली. पण लियाम लिव्हिंगस्टोनने (38 धावा) शेवटच्या षटकात षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिल्लीच्या 174 धावा
नाणेफेक हरल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली. संघाने दोन गडी गमावून 74 धावा केल्या. यानंतर सातत्याने विकेट पडत गेल्या आणि धावसंख्या 147 धावांत 8 विकेट्स अशी झाली. डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत आणि मिचेल मार्श मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. अखेरीस, अभिषेक पोरेलने 10 चेंडूत 32 धावांची खेळी केली आणि धावसंख्या 174 धावांपर्यंत नेली.
हेही वाचा – IPL 2024 KKR Vs SRH : दोन महागड्या खेळाडूंमध्ये थरार..! हैदराबादने जिंकला टॉस, पाहा Playing 11
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमाची सुरुवात पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनने शानदार अर्धशतकाने केली आहे. संघासाठी अडचणींचा सामना केल्यानंतर करनने आपली ताकद दाखवत दिल्लीविरुद्ध उत्कृष्ट खेळी खेळली. पंजाब संघाने 100 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतर एका टोकाला राहून करनने 39 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. त्याने 47 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 63 धावांची खेळी केली.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा