IPL 2024 PBKS vs DC : ऋषभ पंतचे कमबॅक, पंजाबने जिंकला टॉस! वाचा Playing 11

WhatsApp Group

IPL 2024 PBKS vs DC : आयपीएलच्या 17व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे, जे प्रथमच आयपीएलचे आयोजन करत आहे. या सामन्यात पंजाबचा कप्तान शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कप्तान ऋषभ पंतने अपघातानंतर मैदानात वापसी केली असून टॉसदरम्यान अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

गेल्या मोसमात दोन्ही संघांची कामगिरी निराशाजनक होती. पंजाब किंग्जने आयपीएल 2023 मध्ये 14 पैकी 6 सामने जिंकले होते, तर 8 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने 14 पैकी 5 सामने जिंकले आणि 9 सामने गमावले. पंत सुमारे 14 महिन्यांनंतर मैदानात परतला आहे. डिसेंबर 2022 मध्ये एका भीषण कार अपघातातून वाचलेल्या पंतने क्रिकेटच्या आवडीच्या जोरावर कमबॅक केले आहे.

दोन्ही संघांची Playing 11

पंजाब किंग्ज – शिखर धवन (कप्तान), जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.

दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (कप्तान/विकेटकीपर), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment