IPL 2024 : MS Dhoni फॅन्ससाठी महत्त्वाची बातमी, वाचल्याशिवाय जाऊच नका!

WhatsApp Group

IPL 2024 MS Dhoni | इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली आहे. विद्यमान चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज संघाने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून विजयी सुरुवात केली. महेंद्रसिंह धोनीने या मोसमात कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान सोपवण्यात आली. चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी येत आहे. या मोसमातील सर्वात मोठा सामना धोनीच्या बालेकिल्ल्यामध्ये होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. एक क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तर दुसरा क्वालिफायर चेन्नईमध्ये होणार असल्याची माहिती आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने गेल्या वर्षीच्या गतविजेत्या (चेन्नई सुपर किंग्ज) च्या घरच्या मैदानावर सुरुवातीचा सामना आणि अंतिम सामना आयोजित करण्याची परंपरा पाळली आहे.

हेही वाचा – IPL 2024 RR Vs LSG : टॉस जिंकून राजस्थानची प्रथम फलंदाजी, ‘या’ खेळाडूचे पदार्पण! पाहा Playing 11

बीसीसीआयने सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा लक्षात घेऊन आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक निश्चित केले असून ते लवकरच जाहीर केले जाईल. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांच्या तारखा खूप आधी जाहीर झाल्या होत्या. 10 संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीगमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी 21 सामन्यांची तारीख व ठिकाणाचे वेळापत्रक सर्वांसमोर आहे. उर्वरित सामन्यांच्या तारखा आणि ठिकाण यावर निर्णय घ्यावा लागेल.

धोनीची शेवटची आयपीएल?

ही आयपीएल भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा चॅम्पियन खेळाडू महेंद्रसिंह धोनीची शेवटची स्पर्धा असेल की नाही, अशी चर्चा गेल्या अनेक मोसमांपासून सुरू आहे. प्रत्येक वेळी तो पुढे ढकलतो, मात्र यावेळी तो कदाचित निवृत्ती जाहीर करेल, असे मानले जात आहे. याआधीही त्याने रवींद्र जडेजाकडे संघाचे कर्णधारपद सोपवले होते, मात्र तो ते पूर्ण करू शकला नाही आणि त्याने ते सोडण्याचा निर्णय घेतला.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment