Video : “काही फरक पडत नाही”, मोहम्मद शमीच्या वक्तव्याने चर्चा रंगली!

WhatsApp Group

आयपीएल 2024 साठी (IPL 2024) सर्व संघांनी आपापल्या शिबिरांची तयारी केली आहे. गेल्या महिन्यात आयपीएलच्या मिनी लिलावात फ्रेंचायझींचे अनेक मोठे निर्णय पाहायला मिळाले. मात्र लिलावापूर्वी दोन्ही फ्रेंचायझींमधील खेळाडूंच्या फेरबदलाने सर्व चाहत्यांना हादरवून सोडले होते. गुजरात टायटन्सला दोनदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचवणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबईने कर्णधार म्हणून नियुक्त केले. मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami On Hardik Pandya) वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाला तोंड फुटले आहे.

आयपीएल लिलावापूर्वी हार्दिक पांड्या त्याच्या जुन्या फ्रेंचायझी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. यानंतर मुंबईनेही त्याला आपला नवा कर्णधार म्हणून निवडले. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने संघाची कमान युवा शुबमन गिलकडे सोपवली. याबाबत गुजरातचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीशी चर्चा केली असता, त्याने या विषयावर आपले मत मांडले. शमी मीडियाशी बोलताना म्हणाला, ”कोणाच्यातरी जाण्याने काही फरक पडत नाही. हार्दिकला जायचे होते आणि तो गेला. कर्णधार म्हणून त्याने चमकदार कामगिरी केली आणि एकदा आयपीएल ट्रॉफीही जिंकली. तो आयुष्यभर गुजरातशी बांधला गेला नव्हता.”

शुबमन गिल हा नवा कर्णधार असेल

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलला गुजरातचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, गिलला संघातील वरिष्ठ खेळाडूंची मदत मिळू शकते. गिलने यापूर्वी एवढ्या मोठ्या मंचावर कर्णधारपद पाहिले नव्हते. आता युवा खेळाडूच्या नेतृत्वाखाली दोनवेळा फायनलमध्ये आलेला संघ यावेळी विजय मिळवण्यात यशस्वी होतो, की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

हेही वाचा – मुघल बादशाह जो रामभक्त बनला! अशी नाणी काढली, ज्याच्यावर…

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलला गुजरातचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. मात्र, गिलला संघातील वरिष्ठ खेळाडूंची मदत मिळू शकते. गिलने यापूर्वी एवढ्या मोठ्या मंचावर कर्णधारपद हाती गेले नव्हते. आता युवा खेळाडूच्या नेतृत्वाखाली दोनवेळा फायनलमध्ये आलेला संघ यावेळी विजय मिळवण्यात यशस्वी होतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment