MI vs SRH : सूर्यकुमार यादवचे तडाखेबंद शतक, मुंबईचा हैदराबादवर 7 विकेट्सने विजय!

WhatsApp Group

IPL 2024 MI vs SRH : वानखेडेवर झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 गड्यांनी विजय मिळवला आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर 3 बाद 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात सूर्यकुमार यादवच्या शतकामुळे मुंबईने 3 गडी गमावून 18व्या षटकात सामना जिंकला. सूर्याने 12 चौकार आणि 6 षटकारांसह 102 धावा केल्या, तर तिलक वर्माने नाबाद 37 धावांची खेळी केली. रोहित शर्मा (4), इशान किशन (9), नमन धीर (0) पुन्हा अपयशी ठरले.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने 8 गडी गमावून 173 धावा केल्या. संघासाठी सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत सर्वाधिक 48 धावांची खेळी खेळली. तर नितीश रेड्डीने 20 धावा केल्या. शेवटी, कर्णधार पॅट कमिन्सने जबाबदारी स्वीकारली आणि 17 चेंडूत नाबाद 35 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. कर्णधार आणि वेगवान गोलंदाजी अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू पीयुष चावला यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अंशुल कंबोजने 1-1 विकेट घेतली.

हेही वाचा – भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स पुन्हा इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर अंतराळात जाणार!

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, पॅट कमिन्स (कप्तान), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment