IPL 2024 : मुंबई इंडियन्सची लाजिरवाणी बॅटिंग, रोहित शर्मासोबत दोघे शून्यावर आऊट!

WhatsApp Group

IPL 2024 MI vs RR | आयपीएलमध्ये आज वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. राजस्थान रॉयल्सने येथे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. घरच्या मैदानात खेळतानाही मुंबई इंडियन्सने लाजिरवाणी फलंदाजी केली. मुंबईला 20 षटकात 9 बाद 129 धावा केल्या. राजस्थानच्या ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर आणि युझवेंद्र चहल यांनी मुंबईच्या फलंदाजांना जखडून ठेवले.

मुंबईची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना खातेही खोलता आले नाही. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन हादरे दिले. इशान किशनही 16 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर कप्तान हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी अनुक्रमे 34, 32 धावांची खेळी केली. टिम डेव्हिडही मोठे फटके खेळू शकला नाही. चहल आणि बोल्ट यांनी 3-3 विकेट्स काढल्या. बर्गरला 2 विकेट्स मिळाल्या.

हेही वाचा – रोहित शर्मा आऊट झाला म्हणून सेलिब्रेशन करणाऱ्या व्यक्तीला बेदम चोप, रुग्णालयात मृत्यू!

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कप्तान), टीम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्विना मफाका.

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कप्तान), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment