MI vs LSG : मुंबई इंडियन्सला शेवट गोड करण्यासाठी 215 धावांची गरज, निकोलस पूरनचे तुफान!

WhatsApp Group

IPL 2024 MI vs LSG : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स त्यांचा शेवटचा सामना खेळत आहेत. वानखेडेवर रंगणाऱ्या या सामन्यात टॉस गमावलेल्या लखनऊने प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 215 धावांचे विशाल आव्हान दिले आहे. लखनऊकडून केएल राहुल आणि निकोलस पूरन यांनी अर्धशतके झळकावली. मुंबईकडून पीयुष चावला आणि नुवान तुषारा यांनी 3-3 विकेट्स घेतल्या.

लखनऊने 20 षटकात 214/6 धावा केल्या. कप्तान आणि सलामीवीर केएल राहुलने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावा केल्या, तर पूरनने विस्फोटक खेळी करत फक्त 29 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह 75 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर शेवटच्या फळीच आयुष बदोनीने नाबाद 22 आणि कृणाल पांड्याने नाबाद 12 धावा केल्या. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत संघात जागा मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरने 2.2 षटके गोलंदाजी केली आणि 22 धावा खर्च केल्या.

हेही वाचा – Income Tax Return : ITR भरताना ‘या’ 10 चुका चुकूनही करू नका, नोटीस येईल!

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पीयुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment