IPL 2024 : शेवटच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स पराभूत, लाजिरवाणा सीजन, हार्दिक पांड्या नापास!

WhatsApp Group

IPL 2024 MI vs LSG : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या हंगामाची सांगता पराभवाने केली आहे. वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा 18 धावांनी पराभव केला. या विजयानंतर लखनऊने 14 गुणांसह आपली मोहीम संपवली. तर मुंबईला फक्त 8 गुणांसह दहाव्या स्थानावर राहावे लागले. मुंबईने त्यांचे 14 पैकी 10 सामने गमावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात यंदा मैदानात उतरलेला मुंबई इंडियन्स संघ सपशेल अपयशी ठरला.

या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. लखनऊने 20 षटकात 214/6 धावा केल्या. कप्तान आणि सलामीवीर केएल राहुलने 3 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावा केल्या, तर पूरनने विस्फोटक खेळी करत फक्त 29 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह 75 धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर शेवटच्या फळीच आयुष बदोनीने नाबाद 22 आणि कृणाल पांड्याने नाबाद 12 धावा केल्या. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत संघात जागा मिळालेल्या अर्जुन तेंडुलकरने 2.2 षटके गोलंदाजी केली आणि 22 धावा खर्च केल्या.

हेही वाचा – Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वेमध्ये निघाली मोठी भरती!

प्रत्युत्तरात मुंबईकडून रोहित शर्माने 10 चौकार आणि 3 षटकारांसह 68 धावांची खेळी केली, तर नमन धीरने 4 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 62 धावा फटकावल्या. दोघांनी मुंबईचा पराभव टाळायचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. हार्दिक पांड्या (16), इशान किशन (14), सूर्यकुमार यादव (0) अपयशी ठरले. लखनऊकडून नवीन उल हक आणि रवी बिश्नोई यांनी 2-2 विकेट्स घेतल्या.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment