IPL 2024 : अर्जुन तेंडुलकरने मार्कस स्टॉइनिसला दाखवला राग! पुढे काय झालं पाहा Video

WhatsApp Group

IPL 2024 MI vs LSG Arjun Tendulkar : आयपीएल 2024च्या 67 व्या लीग सामन्यात, मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले. लखनऊविरुद्धच्या या सामन्यात तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. रोहित शर्माचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, परंतु त्याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात समावेश करण्यात आला असून तो फलंदाजीही करू शकतो. अखेर मुंबईने आपला वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला खेळण्याची संधी दिली. या सामन्यात मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

अर्जुन तेंडुलकरला या मोसमातील पहिला सामना खेळण्यासाठी 13 सामन्यांची प्रतीक्षा करावी लागली. अर्जुनने संपूर्ण सीझन बेंचवर बसून घालवला, पण शेवटच्या सामन्यात मुंबईने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने गोलंदाजी करताना पहिल्या दोन षटकात फक्त 10 धावा खर्च केल्या. या दरम्यान त्याने लखनऊचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसला अग्रेशनही दाखवले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – गौतम गंभीरला टीम इंडियाचा हेड कोच बनण्याची ऑफर!

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पीयुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment