IPL 2024 MI vs KKR : मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस, रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर!

WhatsApp Group

IPL 2024 MI vs KKR : आयपीएलमधील आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांचे लक्ष दोन गुण मिळविण्यावर असेल. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने संघात एक बदल केला आहे. मोहम्मद नबीच्या जागी नमन धीरला संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या सामन्यांमध्ये मुंबईचा वरचष्मा राहिला आहे, कारण मुंबई इंडियन्सने 23 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता संघ केवळ 9 वेळा मुंबईला पराभूत करू शकला आहे. आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघातील अनेक स्टार क्रिकेटर्सचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – मुंबई इंडियन्स अजूनही खेळू शकते IPL 2024 Playoffs, जाणून घ्या समीकरण!

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – इशान किशन, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कप्तान), नमन धीर, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.

कोलकाता नाइट रायडर्स – सुनील नरिन, अंगकृष्ण रघुवंशी, श्रेयस अय्यर (कप्तान), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment